Site icon Aapli Baramati News

संजय राऊत हे शिवसेनेचे कमी आणि शरद पवारांचे जास्त आहेत: चंद्रकांत पाटील

ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर :प्रतिनिधी

नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीने जप्त केली. त्यादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत संजय राऊत हे शिवसेनेचे कमी आणि शरद पवारांचे जास्त आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाई झाली. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार कधी कोणाला भेटायला गेले नाहीत. मात्र संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवतात. मी खूप आधीपासून सांगत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे कमी आणि शरद पवारांचे जास्त आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

शरद पवार हे केवळ चहा पिण्याकरिताच नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊ शकत नाहीत. हे मी खात्रीने सांगू शकतो असे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे केवळ अजून मधूनच वर्तमानपत्रे वाचत असावेत. त्यामुळे त्यांना ईडीच्या कारवाईतून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे वाटत आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लावला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version