आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

रावसाहेब दानवेंनी केली तिरुपतीतील न्हाव्यांसोबत महाविकास आघाडी सरकारची तुलना

राजकारण
ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांची तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांसोबत तुलना केली आहे. केस काढण्यासाठी आलेले भाविक निघून जाऊ नयेत म्हणून जसं ते सुरुवातीला काही केस काढतात, तसंच महाविकास आघाडी सरकारचं काम सुरू असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

जालन्यात आयोजित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प : महाराचत्राच्या व्यापार उद्योग कृषी क्षेत्रासाठी काय मिळणार’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.

राज्यात भाजपचे सरकार आणखी पाच वर्ष पाहिजे होते. परंतु राज्यात भाजपची सत्ता नसल्याची खंत सगळ्यांनाच आहे. तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारने राज्यात काहीच कामे केली नसून फक्त काही लाखांच्या निधीतून रस्त्यांची कामे करून बोळवण केली आहे.  तिरूपतीतील नाव्ह्यांची पद्धत महाविकास आघाडी सरकारने अवलंबली असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

तिरुपती बालाजी मधील न्हावी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांच्या डोक्यावरचे केस संपुर्ण न काढता त्यांना तसेच तिथे बसवून ठेवतात. उर्वरित डोक्यावरचे केस समोरचे ग्राहक संपल्यानंतर काढतात.  आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहकांना खेचण्यासाठी ते असे करत असतात असे सांगत महाविकास आघाडीतील पक्षांपासून लोकांनी दूर जाऊ नये म्हणून हे पक्ष दोन वस्तारे हाणून विकासकामांना तुटपुंजा निधी देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us