
मुंबई : प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यवर्ती निवडणूक तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे दिल्लीत देखील राज्यातील मध्यवर्ती निवडणुकीचे तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे, असा मोठा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हा दावा केला. संजय राऊत म्हणाले, सध्या महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत अस्थिर झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक घेण्याचे कारस्थान दिल्लीत रचले जात आहे. याबद्दल हालचाली सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात आहेत. याबद्दल राजकारण बाजूला ठेऊन विचार व्हायला हवा. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र बसून याबद्दल विचार करायला हवा. महाराष्ट्राचे फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक नुकसान होत आहे. राज्याला कमजोर करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राल देशाच्या नकाशावरून मिटवण्याचे काम पडद्यामागून काम सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.