
पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल बोलताना अजब वक्तव्य केले. यावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद लाड यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती नसेल, तर त्यांनी इतिहास माहिती करून घ्यावा. शिवरायांबद्दल सतत बेताल वक्तव्य करणाऱ्यांची जीभ छाटली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे बेताल वक्तव्य करणाऱ्या त्यांच्या नेत्यांना आवर घालायला हवा, असे रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.
प्रसाद लाड हे शिवरायांचा विकृत इतिहास मांडत आहेत. त्यामुळे प्रसाद लाड यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांची जीभ छाटली पाहिजे. त्यांचा कडेलोट केला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया रूपाली पाटील ठोंबरे यांनी दिली. तसेच भाजप नेते जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.