Site icon Aapli Baramati News

POLITICAL : महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुरावे सादर करत माफीवीर असा उल्लेख केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाकडून राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा इशारा दिला. संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणे योग्य नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे श्रद्धास्थान आहेत. राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलण्याची काहीही गरज नव्हती. अशामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते.

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही वक्तव्याबद्दल धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला सावरकरांबद्दल मोठा आदर आहे. इतिहासामध्ये काय घडले आहे. हे डिवचत बसण्यापेक्षा नवीन इतिहास निर्माण करावा, राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version