आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

Political Breaking : संजय राऊत आणि वसंत मोरे यांची झाली पुण्यात भेट; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय काढल्यापासून नाराज असलेले नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात आज भेट झाली. या भेटीत संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुक करताना पुन्हा भेटू म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी पुण्यातील एका विवाह सोहळ्याला हजेरी लावली. याच सोहळ्यात वसंत मोरे हेही उपस्थित होते. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना तात्या नावाने संबोधत गळाभेट घेतली. इतकंच नाही तर त्यांच्या कामाचे कौतुकही केले. ठाण्यातील भाषण ऐकल्याचेही त्यांनी वसंत मोरे यांना सांगितले.

दरम्यान, आजच्या या भेटीने राजकीय वर्तुळात विशेषत: मनसेमध्ये वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. या भेटीदरम्यान, संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना पुन्हा भेटू असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. अशातच आज संजय राऊत आणि वसंत मोरे यांची अनौपचारीक भेट चर्चेचा विषय ठरली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us