आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

POLITICAL BREAKING : महाविकास आघाडीची मुंबईत बैठक संपन्न, १५ ऑगस्टनंतर राज्यभर दौरे आणि वज्रमूठ सभांचंही आयोजन होणार

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आमदारांची एक बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत १५ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्याचवेळी राज्यभरात पुन्हा एकदा वज्रमूठ सभांचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी वाटचालीबाबत भूमिका ठरवण्यात आली.

१५ ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे राज्यभर दौरा करणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल जनतेत जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. तसेच आगामी काळात राज्यभरात पुन्हा एकदा वज्रमूठ सभांचं आयोजन केलं जाणार आहे. तसेच जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या दौऱ्याचं आणि सभांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आली.

शरद पवार यांचाही महाराष्ट्र दौरा

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्याचा दौरा करतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार येवल्यात शरद पवार यांची सभाही झाली होती. परंतु त्यानंतर हा दौरा थांबवण्यात आला होता. आता नव्याने १५ ऑगस्टनंतर शरद पवार हे राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यातून या दौऱ्याची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us