आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

POLITICAL BREAKING : भाजपचा खडखडाट बारामतीकरांना चांगलाच समजतोय : सुप्रिया सुळेंचा टोला

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

अर्थमंत्री सीतारमण यांचं बारामती मतदारसंघात स्वागतच आहे. कसं आहे हे, ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगडं मारतात. म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे. पण जनता सुजान आहे. भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय. आम्ही आपलं विकासाची कामं सुरूच ठेवणार अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पुण्यातील कचरा प्रश्नावर आज आयोजित आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्यांवर मत व्यक्त केले. ‘विविध सर्वेंमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसत आहे. त्यामुळेच महानगरपालिका निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहेत. मात्र या प्रशासक राजमध्ये जनता वाऱ्यावर सोडली जात असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

ईडीच्या तावडीत सापडलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ‘जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. सोबतच या प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर हे उघड उघड ब्लॅकमेलिंग होतं असे मतही त्यांनी मांडले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us