आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

कोणत्याही आमदारांना फुकट घर मिळणार नाही : अजितदादांची स्पष्टोक्ती

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळातील ग्रामीण आमदारांसाठी ३०० घरे निर्माण करणार असल्याची मोठी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानंतर काही आमदारांनी या निर्णयाचा विरोध केला. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही आमदारांना फुकट घर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल आमदारांना हक्काची सदनिका मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र  आमदारांना फुकटच घरे मिळणार असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. ती घरे सगळ्यांना मिळणार नाहीत. त्या घरांची काही किंमत मोजावी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

मी आणि माझ्या पत्नीच्या नावे घर मिळणार नाही. राज्यात अशी काही आमदार आहेत की त्यांना जनतेच्या कामासाठी मुंबईत येऊन राहावे लागते. त्यांच्यासाठी घरे आहेत. मात्र कालपासून प्रसारमाध्यमांनी इतके ठोक ठोक ठोकले की ते घरे फ्लॅट असल्याचे वाटते. आपण गरीब आमदारांना घरे देण्याचा प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us