Site icon Aapli Baramati News

नाना पटोले यांच्या ‘त्या’ ट्विटने खळबळ; लवकरच करणार मोठा ‘खुलासा’..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

‘थोड्याच वेळात मोठा खुलासा करणार’ असे खळबळजनक ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यावरून आता नाना पटोले यांच्या रडारवर कोण असणार याविषयी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची छापेमारी सुरू आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असा आरोप महाविकास सरकारकडून केला जात आहे. ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या माणसाकडून जमिनी घेतली असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता नाना पटोलेंनी प्रत्यूत्तर देत निशाणा साधला आहे.  या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस  यांना त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले. इकबाल मिरची कोण आहे? तो भाजपचा नातेवाईक आहे का ? त्याचे कोणासोबत संबंध होते? असे सवाल त्यांनी विचारले.

त्यानंतर आता त्यांनी लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे खळबळजनक ट्विट केले आहे. कुलाबा येथील गांधी भवनात पत्रकार परिषद घेणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत इकबाल मिरचीबद्दल खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version