Site icon Aapli Baramati News

भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर धाड पडू शकते : संजय राऊत

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यांच्या वकीलांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांच्या विरोधात माहिती दिली जाते त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कारवाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर कारवाई होऊ शकते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असे संजय राऊत म्हणाले.

ईडीच्या धाडी हा काही चिंतेचा विषय राहिला नसून गमतीचा विषय झालेला आहे. सतिश उके हे लढल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायाचा तराजू हा सरळ पाहिजे, परंतू तो सरळ नाही. राज्यातील विरोधी पक्ष हे केंद्रिय तपास यंत्रणेचा वापर करुन अराजकता पसरवत आहेत असा आरोप त्यांनी केला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version