मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत या नोटीशीमागचं कारण फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी त्यांनी सूडापोटी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या गृह खात्याचा मी घोटाळा बाहेर काढला असून त्याबाबत केंद्रीय गृह सचिवांना माहिती सादर केली होती. त्यामुळे राज्य सरकारने जाणीवपूर्वक मला लक्ष्य केले आहे. वास्तवात मला जी माहिती मिळाली ती मी केंद्रीय गृह विभागाशिवाय अन्यत्र दिलेली नाही. त्यामुळे उद्या माझी चौकशीही झाली, तरी एक विरोधी पक्षनेता म्हणुन माझ्या माहितीचा स्त्रोत मला विचारला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. त्याला तीन दशके उलटूनही त्याचे पडसाद अजूनही तसेच आहेत. या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ज्यांचा बॉम्बस्फोटाशी संबंध होता ते जेलमध्ये जाऊनही त्यांचं आज मंत्रिपद कायम आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.