आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

युक्रेनमध्ये विद्यार्थी बेपत्ता असताना मोदी स्वत:चीच पाठ थोपटतात : नाना पटोले यांचा घणाघात

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भारताने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी हे पंतप्रधान नसून ते प्रचारक आहे. विद्यार्थी बेपत्ता असताना ते स्वत: पाठ थोपटतात, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र राज्याला न शोभणारे व्यक्ती म्हणून राज्यपाल लाभले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून भाजपा त्याला पाठिंबा देते हे चुकीचे आहे. जर अशा व्यक्तीला भाजप राज्यपाल बनवणार असेल तर काँग्रेस पंतप्रधानांप्रमाणे राज्यपालांविरोधात गो बॅकचे नारे लावेल. मोदी हे  प्रचारक आहेत. एअर इंडियाने तिकिटांचा दर वाढवल्याने २० हजार विद्यार्थी अडचणीत आले आहेत. अनेक जण बेपत्ता असताना मोदी स्वत:ची पाठ थोपटतात, असे ते म्हणाले.

भाजप पक्ष ओबीसींचा शत्रु असून स्वत:वरचे सगळे आरोप ते राज्य सरकारवर ढकलत आहेत. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. परंतु ओबीसी समाजाला भाजपला आरक्षण द्यायचे नाही.पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आपली बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर ५०० कोटींचा मानहानीचा  दावा ठोकणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us