Site icon Aapli Baramati News

महाविकास आघाडी सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिए : चंद्रकांत पाटील यांचे मिश्किल ट्विट

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजप नेत्यांनी राज्य सरकार विरोधात आवाज उठवला होता. त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कृषीपंपांना दिवसा वीज द्या या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले होते. दरम्यान मंगळवारी विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज तोडण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत विरोधकांनी सरकारला टोमणे मारले आहेत. महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिये!  अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावून झालेल्या शेतकऱ्यांच्या वीज तोडणी संदर्भात सरकारला नमावेच लागले. विजतोडणी तात्काळ थांबवण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजप सदैव खंबीरपणे उभी राहील अशा मिश्किल शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे.

” वीज तोडणी संदर्भात सरकारचा निर्णयाबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. हा निर्णय अधिवेशन संपल्यानंतर कायम रहावा एवढीच इच्छा ” अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन राऊत यांच्यावर केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version