आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

MAHARASHTRA POLITICS : मी एकदा दिल्लीला जाऊन आलोय; आता तिथली जबाबदारी माझ्या बहिणीवर दिलीय : पत्रकारांच्या ‘त्या’ प्रश्नावर अजितदादांचं खुमासदार उत्तर..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या वक्तव्यांसाठी आणि त्यातील टोलेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रीय राजकारणात तुम्हाला जावं असं वाटत नाही का असा प्रश्न अजित पवार यांना विचारला. त्यावर अजितदादांनी मी एकदा दिल्लीला जाऊन आलोय, पण तिथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मला महराष्ट्रच बरा वाटतो. त्यामुळं आता तिथली जबाबदारी माझ्या बहिणीवर दिल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बिहारमध्ये कोसळलेल्या पूलाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी संबंधित कामाची चौकशी व्हायला हवी आणि दोषींवर कारवाई करावी असे मत व्यक्त केले. याबाबत आपल्याकडे अधिक काय अधिक माहिती आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी माझ्याकडे अधिकाची माहिती नाही, मी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष देतो. बाहेर लक्ष देत नाही असं स्पष्ट केलं.

या प्रश्नानंतर तुम्ही अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आहात, तुम्हाला कधी दिल्लीच्या राजकारणात जावं असं वाटत नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. अजित पवार म्हणाले, मी एकदा दिल्लीला जाऊन आलो आहे. १९९१ साली मला बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जवळपास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत पाठवले होते. त्यावेळी मी दिल्लीतलं राजकारण पाहिल्यावर विचार केला की गड्या आपला महाराष्ट्रच बरा..!

तुम्हाला केंद्रीय मंत्री व्हावं असं वाटत नाही का या प्रश्नाला उत्तर देताना मला अजिबात तसं वाटत नाही. मी ती सगळी जबाबदारी माझ्या बहिणीवर टाकली आहे असं सांगत अजितदादांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us