आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन तापलं; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केले निलंबित

राजकारण
ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

नागपूरमध्ये चालू असलेलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चांगलेच आपले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विधिमंडळाचे नागपुरातील अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सभागृहात बोलताना तालिका अध्यक्षांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळत आहे. विधानसभेचे अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी जयंत पाटील यांनी सभागृहात विधानसभा अध्यक्ष यांच्या बद्दल बोलताना अप शब्दांचा वापर केला. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी पक्षांनी जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

या दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाला विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बोलू दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी ‘तुम्ही निर्लज्जपणा करू नका’ असे शब्द अध्यक्षांना वापरले. त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. परिणामी जयंत पाटील यांच्यावर विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us