आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

किरीट सोमय्या ईडीचे एजंट आणि ईडी भाजपाचे एटीएम मशीन बनलीय : संजय राऊत यांचा गंभीर आरोप

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.  केंद्रीय तपास यंत्रणांच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्याचवेळी किरीट सोमय्या हे ईडीचे एजंट आहेत आणि ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे असाही आरोप त्यांनी केला आहे.

संपूर्ण देशामध्ये ईडीच्या धाडी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच घडत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख १४ नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. मग भाजपाच्या नेत्यांवर धाडी का पडत नाहीत ? ते मुंबईच्या रस्त्यावर भीक मागत आहेत का? आयटी विभागात मोठी भानामती सुरू आहे. परंतु शिवसेना ही सगळी भानामती कोण करत आहे, याचा खुलासा करणार असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.

किरीट सोमय्या हे ईडीचे वसुली एजंट बनले आहेत. ईडीचे अधिकारी भारतीय जनता पार्टीचे एटीएम मशीन बनलेले आहे. मी यासंदर्भातील वसुलीचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून बिल्डर्स आणि व्यावसायिकांना धमकावले जात आहे. तुम्ही आमच्या घरात घुसता, मात्र तुमच्याही घरात घुसण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us