
मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर येत आहे. अवघ्या ७२ तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ३५४ कलमांतर्गत ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यामागे स्पष्टीकरण दिले आहे.
नुकतेच वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडल्या प्रकरणी आणि प्रेक्षकास मारहाण केल्या प्रकरणी अटक केली होती. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड सध्या जामिनावर बाहेर आहेत. हर हर महादेव हा चित्रपट इतिहासाची तोडफोड करणार आहे असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. अशातच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले