Site icon Aapli Baramati News

आपण ज्या घरात वाढलो, ते घर उध्वस्त करणे बेईमानी आहे; अजितदादांचा शिंदे गटावर निशाणा

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून मोठे बंड करून बाहेर पडले. त्यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आपण ज्या घरात वाढलो. ते घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी आहे, अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे दोन दिवसीय चिंतन शिबिर सुरु आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. अजित पवार म्हणाले, आपला पक्ष सोडून जाऊन मुख्यमंत्री होणे चुकीचे नाही. पक्ष सोडून जाणे चुकीचे नाही. मात्र आपण ज्या घरात वाढलो आहोत, ते घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी आहे. शिवसेनेमध्ये घडलेला प्रकार हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही, असे अजित पवार म्हटले.

पक्षावर स्वतःचा दावा योग्य करणे योग्य नाही. राजकारणामध्ये राक्षसी महत्वकांक्षा ठेवणे योग्य नाही. नंतरच्या काळात त्याची किंमत मोजावीच लागते. यापुढे आपल्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कसे आणता येईल, हे बघितले पाहिजे. यासाठी पक्ष अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे असे अजित पवार म्हटले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version