आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

घराजवळच असलेल्या चैत्यभूमीवर किती वेळा गेलात आणि किती वेळा जय भीम बोललात : जितेंद्र आव्हाड

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. मात्र त्यानंतर राज ठाकरे सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घराजवळच असलेल्या चैत्यभूमीवर किती वेळा गेलात ? किती वेळा जय भीम बोललात, असा प्रतिसवाल राज ठाकरे यांना केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांना लक्ष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करा, असे सांगणारे राज ठाकरे घरापासून अवघ्या १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीला किती वेळा गेले ? तुम्ही ६ डिसेंबरला कुठे असता ? आयुष्यात किती वेळा जय भीम म्हणालात ? असे अनेक प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.

मी मागासवर्गीय असून गेल्या ३५ वर्षाच्या राजकारणात पवारसाहेबांना कधीच जातीपातीचे राजकारण करताना पाहिले नाही. माझे आई, वडील कधीच राजकारणात नाहीत. माझी कुठलीही बँक नाही. कोणताही कारखाना नाही. तरीदेखील आज मी राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.

छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आम्ही सगळे मागासवर्गीय आहोत. तरीदेखील आम्हाला विविध स्तरांवर संधी मिळालीच ना असे सांगत पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाईन्स मिळत नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचवेळी महाराष्ट्र पेटेल अशी वक्तव्य करू नका असेही आवाहन त्यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us