
कोपरगाव : प्रतिनिधी
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे अंत्यविधी होणार आहे.
१९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्याचबरोबर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला दिशादर्शक काम केले. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता सहा दशके ते आमदार होते.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाची उभारणी केली. त्यात त्यांनी काळानुसार बदल करत विविध अभ्यासक्रम आणले. महसूल, कृषी, परिवहन आणि उत्पादन शुल्क या खात्यांचे त्यांनी मंत्रीपद भूषवले होते.