आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता : चंद्रकांत पाटील

राजकारण
ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून नाराजीनाट्य असल्याच्या चर्चेला उधाण आलं असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्री पद देऊच नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण दिला होता असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केले. नाराजी नाट्याच्या घडामोडीवर काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आता सल्ला देण्याची वेळ निघून गेलेली आहे. त्यावेळी मी त्यांना सल्ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्री पद देऊच नका, असे मी म्हटले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. दुसरा पक्ष खाण्यामध्ये  मास्टर आहे. खाल्ले की बाजूला फेकून देतात. हा त्यांचा इतिहास असल्याचे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आजही हे सल्ले ऐकण्याच्या स्थितीत उद्धवजी असतील, असे मला वाटत नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्री पदावरून नाराजी आसल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री उत्तम काम करत आहेत, अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी दिली. तर दुसरीकडे स्वत: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री माझ्यावर कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचे सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us