Site icon Aapli Baramati News

Political Breaking : राज्यात पुन्हा भाजपला सत्तेत येऊ देणार नाही : शरद पवार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडीतील युवा आमदारांनी आज ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत युवा आमदारांना सल्ला देत असताना शरद पवार यांनी भाजपला राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच युवा आमदारांना भाजपाची राजकीय शैली आत्मसात करण्याचा कानमंत्रही पवार यांनी दिला आहे.

शरद पवार यांची भेट घेणाऱ्या महाविकास आघाडीतील युवा आमदारांमध्ये राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, आशुतोष काळे, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील, अतुल बेनके आणि योगेश कदम यांचा समावेश होता. यावेळी शरद पवार यांनी युवा आमदारांना राजकीय सल्ला दिला. भाजपाला राज्यात पुन्हा सत्तेत येऊन देणार नसल्याचे सांगितले. तसेच भाजपाकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे शरद पवार यांनी आमदारांना सल्ला देताना सांगितले. 

एकीकडे शरद पवार यांनी भाजपाला पुन्हा सत्तेत येऊन देणार नसल्याचे सांगितले आहे.अशातच विरोधक देव पाण्यात बुडवून बसले होते. परंतु मुंगेरीलालचे हसीन सपने पूर्ण होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात देखील भाजपाचा भगवा फडकत एक हाती सत्ता आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी  नागपुरात म्हटले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version