Site icon Aapli Baramati News

शरद पवारांनी पावसात सभा घेतल्याने भाजपाला निमोनिया झाला; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी  साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य करत टीका केली.  त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तापसे यांनी शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली आणि निमोनिया भाजपला झाला, अशी टिका करत प्रत्युत्तर दिले आहे.

महेश तापसे म्हणाले, राज्यातील तरुणांनी शरद पवार यांना भरघोस पाठिंबा दिल्याने भाजपाच्या अनेक नेत्यांना दु:ख झाले आहे. या दु:खातून भाजप नेते वारंवार वेगवेगळे निमित्त शोधून शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. परंतु शरद पवार हे मजबूत राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना केवळ प्रसिद्धी मिळेल. यापलिकडे दुसरे काहीही होणार नाही. शरद पवार यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा असल्याचेही कापसे यांनी सांगितले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना साताऱ्याच्या पावसात भिजून तुम्हाला ५४ जागेच्या वर जाता आले नाही. ती संख्या कायम ठेवायची, म्हणून घाबरून नकात. काळजी करू नकात, असे सांगावे लागते, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेला महेश तापसे यांनी प्रत्युत्तर दिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version