
मुंबई : प्रतिनिधी
पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं सांगितल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत:च निवृत्तीची घोषणा केली आहे. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला निर्णय घेण्याची मागणी केली.
कुठे थांबायचं हे मला चांगलं कळतं असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांसह उपस्थित नेते भावूक झाल्याचं पहायला मिळाले. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येत घोषणाबाजी करत आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी जयंत पाटील यांना तर अश्रू अनावर झाले. आपल्या नेतृत्वाची केवळ राज्यालाच नाही तर देशाला गरज आहे. त्यामुळे आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.