Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आजचा पुरंदर दौरा रद्द; प्रकृती स्थिर, मात्र डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती काल अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा आजचा पुरंदर दौराही रद्द करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागेल, अशी माहिती मिळत आहें

काल दिवसभरात शरद पवार यांनी विविध संस्थांच्या बैठकांना हजेरी लावली. दुपारी विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ही बाब त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितली. त्यानंतर डॉ. रमेश भोईटे यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल होत शरद पवार यांची तपासणी केली. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभुमीवर शरद पवार यांचा आज होणारा पुरंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. पुढील काही दिवस शरद पवार हे पूर्णपणे विश्रांती घेतील, अशीही माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र त्यांना विश्रांती घेणे आवश्यक असल्यामुळे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच शरद पवार हे दिल्लीत होते. त्यानंतर ते पुण्यातून दिवाळी सणासाठी बारामतीत आले. या दरम्यान, प्रवासाची दगदग, दिल्लीतील प्रदुषण यामुळे त्यांना घशात त्रास जाणवल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. तसेच सततच्या प्रवासादरम्यान विश्रांती न घेतल्यामुळे पाठीचाही त्रास झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नसल्याचे सांगण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version