Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर आज होणार शस्त्रक्रिया; १८ जानेवारीपर्यंत विश्रांतीचा सल्ला

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उजव्या डोळ्यावर आज एक शस्त्रक्रियापार पडणार आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होणार असून शस्त्रक्रियेनंतर १८ जानेवारीपर्यंत शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आज उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होत आहे.

नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान, त्यांनी शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिबिराला हजेरी लावली होती. महिन्याभरापूर्वी त्यांच्या डाव्या डोळ्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर आता उजव्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार आहे.

मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये  तज्ञ डॉक्टरांद्वारे शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेनंतर १८ जानेवारीपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. ही विश्रांती घेणे सक्तीचे आहे, त्यामुळे शरद पवार १८ जानेवारीनंतर पुन्हा आपल्या कामांमध्ये सक्रिय होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version