आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

मोठी बातमी : मराठा आरक्षणाबाबत हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी मुंबईत तातडीची बैठक

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत हालचाली वाढवल्या आहेत. सोमवारी सकाळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात मराठा आरक्षण मंत्रीमंडल उपसमितीची बैठक होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us