Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : तांबे कुटुंबाला काँग्रेस विचारांचा वारसा; विजयानंतर सत्यजित तांबे योग्य निर्णय घेतील : अजितदादांची सूचक प्रतिक्रिया

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिळवलेले यश हे विद्यमान सत्ताधाऱ्यांसाठी चपराक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. तांबे कुटुंबाला काँग्रेस विचारांचा वारसा असून विजयानंतर ते योग्यच निर्णय घेतील असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मिळालेल्या यशावर बोलताना अजित पवार म्हणाले, या निवडणुकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यानी विशेष लक्ष दिले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सभाही घेतल्या होत्या. सत्तेचा शक्य तेवढा वापर केला असतानाही मिळालेले यश ही सत्ताधाऱ्यांसाठी चपराक आहे. याचा सत्ताधारी पक्षाला नक्कीच विचार करावा लागेल.

सत्यजित तांबे यांच्याबाबत बोलताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले. सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाला काँग्रेस विचारांचा वारसा आहे. स्वतः सत्यजित यांनी काँग्रेस पक्षातील विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय झाल्यानंतरही ते योग्यच निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version