Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ‘ते’ वक्तव्य भोवलं; पुण्यातील दत्तनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

महापुरुषांचा अवमान आणि अन्य विषयांवर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत भाजप नेत्यांवर हल्ला चढवला होता. आता याच व्हिडिओमुळे हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर अश्लील आरोप करून महिलांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित महिला आपल्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपचे केंद्रातील मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवर अश्लील भाषेत टीका केली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये महिलांबद्दलही अपशब्द वापरुन लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले आहे.

हर्षवर्धन जाधव यांचे हे वक्तव्य महिलांचा मनात लज्जा उत्पन्न करणारे असल्याचा आरोप करत या महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version