Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला झुकते माप; ठाकरे गटाकडून पत्र देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून मोठे बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची यावर वाद चालू आहे. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभेच्या  पोटनिवडणुकीसाठी  शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी नवीन नावे आणि चिन्हे दिली आहेत. यावरून ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आयोगाकडून शिंदे गटाला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानी पत्र लिहण्यात आले आहे. या पत्रात निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित करत आरोप करण्यात आले आहेत. पत्रात म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय आगोदरच कसे काय उघड करण्यात आले ? आम्ही सादर करत असलेल्या कागदपत्राची माहिती शिंदे गटाला आगोदर कशी काय मिळते ? शिंदे गट विधानसभेची निवडणूक लढत नसतानाही आमचे चिन्ह आणि नाव का गोठवण्यात आले ? असे प्रश्न ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाकडून  शिंदे गटाला झुकते माप देण्यात आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला सापत्न वागणूक देत आहे. आयोगाने दिलेल्या सूचनेनंतरही शिंदे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. निवडणूक आयोग शिंदे गटाला प्राधान्य देत असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version