
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. बारामतीत होत असलेल्या बारामती पॉवर मॅरेथॉनच्या उदघाटन कार्यक्रमानंतर ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, डेंग्युतून बरे झाल्यानंतर अजितदादा प्रथमच जाहीर कार्यक्रमांसाठी बारामतीत येत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ५-४५ वाजता ते बारामती पॉवर मॅरेथॉनच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ६-१५ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत.
सकाळी १० वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार होणार होणार असून या ठिकाणी अजितदादा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. दुपारी २ वाजता फ्रेश फूड मार्टला सदिच्छा भेट देऊन ते कोऱ्हाळे बुद्रुक येथील श्रीराम ऊस लागवड पॅटर्नची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील.
सहयोग सोसायटीत जनता दरबार
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार घेत होते. मात्र उद्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी अजितदादांचा जनता दरबार होणार आहे. पूर्वीच्या काळात सहयोग सोसायटीत अजितदादांचा जनता दरबार होत असे. आता उद्याही सकाळी १० वाजता सहयोग सोसायटीत जनता दरबार होणार आहे.