
मुंबई : प्रतिनिधी
दसर्याच्या सिमोल्लंघनानंतर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी झंझावाती दौरा सुरू करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
भाजप-सेना सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. सत्तेत सहभागे झाल्यानंतर १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र लिहीत जनतेशी संवाद साधला. या पत्रातून त्यांनी आगामी वाटचालीबद्दल दिशा स्पष्ट केली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा पगडा प्रभावीपणे आमच्यावर आहे.
ज्या विचारधारेतून सुसंस्कृत महाराष्ट्र घडला तीच विचारधारा घेऊन अनेक वर्षे काम करत असल्याचे सुनील तटकरे यांनी नमूद केले. आज सत्तेत जाऊन शंभर दिवस होत असताना अजितदादांनी भावनिक साद घातली आहे, भावनिक पत्र लिहिले आहे त्याला जनता नक्कीच प्रतिसाद देईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ह राज्यभर झंझावाती दौरा करणार आहेत, आस माहितीही सुनील तटकरे यांनी दिली. राज्यातील विविध भागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी संकल्प जनतेसमोर ठेवले जातील, अशी माहिती मिळत आहे.