बारामती : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १९ मे रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून अजितदादा नागरीक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी सहयोग या निवासस्थानी उपलब्ध असणार आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून सोमवार दि. २० मे रोजी महाराष्ट्रातील उर्वरीत जागांसाठी मतदान पार पडत आहे. मागील काही महिने निवडणुकीची धामधुम सुरु होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियमित दौऱ्यांमध्ये खंड पडला होता.
निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाल्यानंतर अजितदादा उद्या रविवार दि. १९ मे रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यकर्ते आणि नागरीकांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. बारामती शहरातील सहयोग या निवासस्थानी नेहमीप्रमाणे हा भेटीगाठींचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर दुपारच्या सत्रात अजितदादा परिसरात व्यक्तिगत भेटीगाठी घेवून पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.