Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : हिवाळी अधिवेशन : खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदार निलंबित..!

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  

सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत जवळपास ९२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आजही ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबन केलेल्या खासदारांची संख्या आता १४१ वर पोहोचली आहे.

१३ डिसेंबर रोजी चार तरुणांनी संसद परिसरात येत गोंधळ घातला होता. यातील दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उडी मारली होती. विशेष म्हणजे या तरुणांच्या बुटातून पिवळ्या रंगाचा धूर निघत होता. या घटनेनंतर संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत चौकशी करावी आणि सरकारने यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांकडून होत आहे. त्यातूनच गेल्या चार दिवसांत जवळपास १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल आज ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे.

हे खासदार झाले निलंबित : व्ही. वैथिलिंगम, गुरजीत सिंग औंजला, सुप्रिया सुळे, एसएस.पलानिमनिकम, अदूर प्रकाश, अब्दुल समद, मनीष तिवारी, प्रद्युत बोर्डोलोई, गिरधारी यादव, गीता कोरा, फ्रान्सिस्को सारादिना, एस. जगतरक्षक, एस.आर. पार्थिवन, फारुख अब्दुल्ला, ज्योत्सना महंत, ए. गणेशमूर्ती, माला रॉय, पी. वेलुसामी, ए.चेल्लाकुमार, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, हसनानीन मसूदी, दानिश अली, खलीलुर रहमान,  राजीव रंजन सिंह, सेंथिल कुमार, संतोष कुमार, दुलाल चंद्र गोस्वामी, रवनीत सिंग बिट्टू, दिनेश यादव, के. सुधाकरन, मोहम्मद सादिक, एमके. विष्णुप्रसाद, पीपी मोहम्मद फैजल, सजदा अहमद, जसवीर सिंग गिल, महाबली सिंग, अमोल कोल्हे, सुशील कुमार रिंकू, सुनील कुमार सिंग, एसडी हसन, एम. दनुषकुमार, प्रतिभा सिंह, थोल थिरुमलवन, चंद्रेश्वर प्रसाद, आलोक कुमार सुमन, दिलीश्‍वर कामैत


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version