आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक; ‘या’ कारणामुळे देत होता धमकी..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. नारायण सोनी असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या ४-५ महिन्यांपासून तो फोनवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करून गावठी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल केला होता.देशातील राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या शरद पवार यांना धमकी आल्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला होता.

मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने ठार मारण्याची धमकी शरद पवार यांना देण्यात आली होती. धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. या तपासात फोन करणारा व्यक्ती नारायण सोनी हा असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे तो गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार यांच्या घरी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता हेही तपासात निष्पन्न झाले आहे.

‘या’ कारणामुळे देत होता धमकी

दरम्यान, नारायण सोनी हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो १० वर्षे आपल्या पत्नीसोबत पुण्यात वास्तव्यास होता. मात्र दोघांमध्ये वितुष्ट आल्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याशी फारकत घेत दुसरे लग्न केले होते. त्याच्या या कौटुंबिक प्रकरणात शरद पवार यांनी कारवाई केली नाही, त्यामुळे तो शरद पवार यांना धमकी देत होता अशीही माहिती आता समोर आली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us