Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जामीनाला मिळाली तीन महीने मुदतवाढ

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नवाब मलिक यांच्याबद्दल महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षांनंतर म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी त्यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने या जामीनाबाबत निर्णय घेत आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. या दरम्यान मलिक यांनी जामीन मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. मात्र त्यांना न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आला होता. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाही त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता.

११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. या जामीनाची मुदत संपत आल्यामुळे मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यावर सुनावणी होऊन मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version