Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : राज्यात शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीवर शिक्कामोर्तब; वंचित आघाडीने दिला होकार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होणार असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठी होकार दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन होकार दर्शवला आहे.

रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आम्ही तयार असल्याची माहिती दिली आहे. युतीबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यासोबत दोन वेळा बैठक झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत युती करून लढण्यास तयार असल्याचे रेखा ठाकूर यांनी म्हटले.

पुढे बोलताना रेखा ठाकूर म्हणाल्या, या सगळ्यात आमची एक अडचण आहे. ठाकरे गटाची शिवसेना सध्या महाविकास आघाडीमध्ये सामील आहे. महाविकास आघडीमध्ये सध्या शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये चौथा सहकारी म्हणून सामील असणार की केवळ शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती असेल ? याबाबत वंचित बहुजन आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे रेखा ठाकूर यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version