मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. शरद पवार यांनीच अध्यक्षपदी रहावं असा ठराव आज झालेल्या निवड समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या या निर्णयाला विरोध करत आक्रमक भुमिका घेतली. त्यानंतर निवड समितीचा निर्णय आपण मान्य करु अशी भुमिका शरद पवार यांनी घेतली.
आज या निवड समितीची बैठक मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शरद पवार यांनीच अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे आता याबाबत शरद पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.