
जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, आज सायंकाळी खडसे यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे मुंबईत नेले जाणार असून मुंबईतच उपचार केले जाणार आहेत.
आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. याबाबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणाना खडसे यांच्यासाठी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सायंकाळी ७.३० वाजता त्यांना मुंबईला हलवले जाणार आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत.