आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

Big Breaking : बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटीत; एकनाथ शिंदेंच्या बंडात भाजपच मास्टरमाईंड..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले आहेत. रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास गुजरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात या आमदारांना सुरत विमानतळावर पोहोचवण्यात आले. तिथून हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीत दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या बंडामागे भाजपच मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अशातच त्यांनी सुरतमधील आपला मुक्काम आता गुवाहाटीत हलवला आहे. काल रात्री उशीरा सर्व आमदारांना बसमधून सुरत विमानतळावर नेण्यात आले. तिथून हे सर्व आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले.

आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार आहोत. त्यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज हे दोघेही या आमदारांसोबत आहेत. त्यातून भाजपची ही खेळी समोर आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. यावेळी मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिवसेना आमदारांना थेट सुरतेला हलवण्यात आले. तिथूनच या बंड नाट्याला सुरुवात झाली. विशेष म्हणजे भाजपचे नेते या आमदारांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे आता हा सत्तासंघर्ष कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us