Site icon Aapli Baramati News

Big Breaking : राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अटी शर्तींसह परवानगी..!

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. काही अटी आणि शर्ती लागू करत ही परवानगी देण्यात आली आहे. गेली अनेक दिवस या सभेला परवानगी मिळणार का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मनसेनं मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभेची तयारी केली असून पोलिसांनीही सभेसाठी आराखडा तयार केला आहे. काही अटींसह त्यांना सभेसाठी परवानगी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये अशी अट घालण्यात येणार असून त्यांना तशी नोटीस दिली जाणार आहे. सभा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी या अटी असतील

ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे तसेच लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितेची दक्षता घ्यावी. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत म्हणजेच प्रक्षोभक भाषण करू नये, याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र दिनानिमित्त धर्म, प्रांत, वंश, जात यावरून वक्तव्य करू नये तसेच एखाद्या व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. या व्यतिरिक्त सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करु नये तर वाहन पार्किंगचे नियम पाळणे, कुठल्याही प्राण्याचा वापर न करणे व इतर अटी ठेवण्यात येणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version