आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग; माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह उपाध्यक्षांचाही राजीनामा..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बदलाचे संकेत मिळत आहेत. आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह उपाध्यक्ष सागर जाधव यांनी राजीनामा दिला आहे. येत्या काळात माळेगाव कारखान्याची धुरा नविन चेहऱ्यावर सोपवली जाणार असल्याचे या निमित्तानं स्पष्ट झालं आहे.

माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी जवळपास साडेतीन वर्षे कारखान्याची धुरा सांभाळली. आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे उपाध्यक्ष सागर जाधव यांनीही आपला एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिल्याचं जाहिर केलं आहे. त्यामुळे आता बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.

माळेगाव कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे आता माळेगाव कारखान्याची धुरा ते कोणावर सोपवतात याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे माळेगावच्या अध्यक्षपदासाठी केशवराव जगताप, मदनराव देवकाते, योगेश जगताप, नितीन सातव, आदी संचालकांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाच्या नावावर अजितदादा शिक्कामोर्तब करतात याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us