आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

Big Breaking : राज्यसभेसाठी छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा; शरद पवार यांनी केली घोषणा…!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

नांदेड : प्रतिनिधी

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचा अपक्ष म्हणून राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपला राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याचा मानस जाहीर केला होता. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीची शिल्लक राहणारी मते संभाजीराजे यांना देण्याबाबत निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आमच्या अन्य सहकारी पक्षांशी चर्चा झालेली नाही. मात त्यांच्याकडूनही संभाजीराजे यांना मदत होईल, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केल्यामुळे संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे अन्य पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि कॉँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.      


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us