Site icon Aapli Baramati News

Big Breaking : नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी प्रक्रिया सुरू

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना ईडी न्यायालयाने २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आता मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्याने मलिक यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ईडीने नवाब मलिक २३ फेब्रुवारीला यांना जमिनीच्या व्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. ३ मार्चला त्यांची ईडीची कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची  यांची चौकशी पूर्ण न झाल्याने न्यायालयाने पुन्हा त्यांना ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ईडीकडून अटकेनंतर नवाब मलिक यांची ईडी कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीत ईडीने नवाब मलिक यांच्या चौकशीसाठी त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवून मागितला. परंतु न्यायालयाने ईडी कोठडीला नकार देत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार  न्यायालयाने नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्याने मलिक यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version