आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस अजितदादांसोबत; उद्याच्या बैठकीसाठी पक्षासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी लावणार हजेरी

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी उद्या दि. ५ जुलै रोजी मुंबईत पक्षाच्या आमदार, खासदार, आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादी अजितदादांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अजितदादांनी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार त्यांनी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत निरोपही दिले आहेत.

दुसरीकडे बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील यांनीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाह स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना उद्या अजितदादांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईच्या बैठकीला जाण्याचे नियोजनही सुरू असून बारामती तालुका आणि शहरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us