आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : भाजप-शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार : अजितदादांनी दिले संकेत

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पाचोरा : प्रतिनिधी

राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याची गरज असल्याचे सांगत आगामी निवडणुका महाविकास आघाडीद्वारे एकत्रितपणे लढवण्याचे संकेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिले. आम्ही एकत्र लढलो तर निश्चितपणे राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आयोजित शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अरुण गुजराथी, गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

आजपर्यंतच्या इतिहासात ज्यांनी बंडखोरी केली, त्यांचा पराभवच झाला आहे. चांगल्या कामात आडकाठी घालण्याचे काम या बंडखोरांनी केले आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा अधिकार जनतेला असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, नव्याने सत्तेत आलेल्या सरकारच्या मनमानीला विरोध करायचा असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येणे आवश्यक आहे. आम्ही एकत्र आलो तर भाजप आणि शिंदे गटाचा निभाव लागणार नाही. तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us