Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : राज्यातील सत्तासंघर्षावर आता २१ फेब्रुवारीपासून सुनावणी; घटनापीठासमोरच होणार नियमित सुनावणी

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील सत्तासंघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयात २१ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात होणारी सुनावणी ही पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढेच होणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी घटनापीठाकडे करण्यात आली होती.त्यावर गेल्या तीन दिवसात सुनावणी होवून न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.

आज घटनापीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकाल जाहीर केला. त्यानुसार २१ व २२ फेब्रुवारी रोजी याबाबत सुनावणी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नसल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाकडेच राहणार आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version