मुंबई : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चाना उधाण आले आहे.
गेल्या अनेक काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या. त्यातच मध्यंतरीच्या काळातील अनेक राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांची भुमिका संशयास्पद ठरली होती. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी थेट आपल्या कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते बाबा सिद्धीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात कॉंग्रेसला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.