Site icon Aapli Baramati News

बिग ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातून पहिला राजीनामा; शिंदे गटाच्या ‘या’ खासदारांचा मोठा निर्णय..!

ह्याचा प्रसार करा

हिंगोली : प्रतिनिधी

शिंदे गटाचे हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या नावे हा राजीनामा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार म्हणून मागणी करावी यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, आरक्षणासाठी राजीनामा देणारे हेमंत पाटील हे महाराष्ट्रातील पहिलेच खासदार ठरले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील हे निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सध्या मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान, काही मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. तसेच हेमंत पाटील यांना घेराव घालत लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी मराठा आरक्षणप्रश्नी आपण खासदारांची बैठक बोलावल्याची माहिती देत तुमची मागणी असेल तर लगेच राजीनामा देतो असे म्हणत त्यांनी आंदोलकांकडे आपला राजीनामा सोपवला.

दरम्यान, हेमंत पाटील यांना आज अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. आरक्षण मिळाले पाहिजे आणि मनोज जरांगे यांच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. त्यावर त्यांनी दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version